‘फॉक्सकॉनच्या तोडीस तोड प्रकल्प…’, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

Read Time:1 Minute, 49 Second


नवी दिल्ली | वेदांता-फॉक्सकॉन (Foxconn) ग्रुपचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येता येता राहीला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यामुळे शिंदे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यासंबधी एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत (Udya Samant) यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून संवाद झाल्याचं उदय सामंत म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्याना आश्वासन दिलं आहे. यावेळी वेदातांच्या प्रकल्पापेक्षा मोठा किंवा त्याच्या तोडीस तोड प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात येईल असं आश्वासन दिल्याचं देखील उदय सामंतांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे यांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे राहिल, असं देखील उदय सामंतांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

वेदांता प्रोजेक्टवरून अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

अर्जून कपूरला आली गर्लफ्रेंड मलायकाची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला…

Leave a Reply

Your email address will not be published.

17 + ten =