फडणवीसांसमोर तरूणांचा राडा; काहीही न बोलताच फडणवीस निघून गेले

Read Time:2 Minute, 1 Second


नांदेड | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेडमधील कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी यावेळी केली आहे.

मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी जमा झालेल्या तरुणांनी उपस्थिती केला.

विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्या लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी फडणवीसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं.

रखडलेल्या भरती झाली पाहिजे, अशी मागणी देत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. यानंतर विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच फडणवीस इथून रवाना झालेत.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून सुप्रिया सुळेंना ‘हे’ ट्विट करावं लागलं डिलीट!

Share Market | ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई; गुंतवणुकदार बनले करोडपती

 

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + 11 =