May 19, 2022

फक्त 1 तुकडा रोज, ऑक्सिजन कमी होणार नाही, प्रतिकारशक्ती चौपट, फुफ्फुस स्वच्छ निरोगी..

Read Time:6 Minute, 22 Second

मित्रांनो सध्याची परिस्थिती इतकी भीतीयुक्त झाली आहे की नेमकं काय करावं हेच आपल्याला सुचत नाही. या वातावरणाचा ताण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. कारण आपल्या पैकी बऱ्याच व्यक्तींना बीपी, शुगर आणि इतरही अनेक रोगांचे त्रास आहेत. त्यामुळे ताण वाढतच चालला आहे आणि ताण वाढला की छातीवर दबाव आल्यासारखं वाटते.

कधीकधी धडधड वाढते आणि मन बैचेन होते. अशा सर्व व्यक्तींना एक विनंती, घाबरून न जाता या गोष्टीचा सामना करा. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव हा तुम्हाला निरोगी राहण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येक अवयवाची कार्यशक्ती चांगली असेल तर आपली प्रतिकारशक्ती खूप चांगली असते.

ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असते त्याला कुठलेही व्हायरल इन्फेक्शन होत नाही आणि या सध्याच्या संक्रमणाच्या आणि भीतीयुक्त वातावरणाच्या काळात आपले फुफ्फुस मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम करा. प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या आणि आजारी पडला तर अंगावर काढू नका. वेळीच दवाखान्यात दाखवा.

संक्रमण होऊ नये म्हणून योग्य काळजी घ्या. हे जर तुम्ही सर्व करत असाल तर कुठलेही संक्रमण होणार नाही. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ऑक्सिजनची लेव्हल वाढवण्यासाठी आपण अत्यंत सोफा आणि परिणामकारक उपाय पाहणार आहोत. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.

या उपायासाठी प्रथम एक ग्लास पाणी घ्या. यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळवेल. मित्रांनो गुळवेल हे आयुर्वेदातील अमृता या नावाने ओळखले जाते. याचे हिंदीत नाव गिलोय गुडची असे आहे. रोज आपण याचा एक तुकडा वापरला की आपली प्रतिकार क्षमता दहा पट वाढते. असा हा गुळवेल चमत्कारिक असून छातीतील कफ काढून टाकतो. ऍलर्जी युक्त सर्दी कमी करतो.

याची पावडर आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. आपण जर खेड्यात राहत असाल तर कडुलिंबाच्या झाडावरला गुळवेल काढून आणावा आणि तो वापरावा. कारण तो औषधाने अत्यंत गुणकारी असतो. याचे तुकडे करून वाळवून आपण वर्षभर वापरू शकतो. गुळवेल वात, कफ, पित्त कमी करतो.

फुफ्फुसाची ताकद वाढवतो, ऑक्सिजनची लेव्हल वाढवतो. त्याचप्रमाणे तणाव टेंशन दूर करतो. याचा एक तुकडा वाटून घ्यायचा आहे आणि या मिश्रणात टाकायचा आहे. दुसरा घटक वापरायचा आहे तो म्हणजे अडूळसाची पाने. याला हिंदी मध्ये वासा असे म्हणतात. याची पावडर मेडिकल दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात आणि अनेक ठिकाणी ऑनलाइन देखील मागवू शकतो.

ही वनस्पती बागेत आणि अनेक ठिकाणी उपलब्ध होते. अडुळसा छातीतील कफ काढून फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी फार जुन्या काळापासून वापरण्यात येतो. अडुळसा अडकलेला श्वास मोकळा करतो. घशाचे इन्फेक्शन कमी करतो. ऑक्सिजन लेव्हल वाढवतो. अशा या अडुळसाची दोन ते तीन पाने घ्या. याचे तुकडे करून, बारीक करून या मिश्रणात टाकायचे आहेत.

हे पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्यायचे आहे. यामध्ये अजून एक पदार्थ मिक्स करून काढा बनवणार आहोत. मित्रांनो हा काढा प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते. ज्यांना त्रास आहे त्यांनी दिवसात तीन वेळा घ्यावा. ज्यांना त्रास नाही त्यांनी एक वेळेस घ्यावा. तुम्हाला याचे परिणाम तीन दिवसात दिसायला लागतील. सलग पंधरा दिवस हा काढा बनवून घ्यायचा आहे.

याने उष्णता वाढत नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इतर कुठल्याही काढ्याने उष्णता वाढते. या काढ्याने आपल्या शरीरात उष्णता वाढत नाही. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. फक्त गरोदर मातांनी घेऊ नये. नंतर हा काढा गाळून घ्या. गाळून घेतल्याच्या नंतर थंड होऊ द्या. आता याचे दिवसात तीन वेळेस सेवन करायचे आहे. साधारणतः याचे तीन भाग करावे. यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे.

मध कफ पूर्णपणे कमी करतो. घशाची खरखर कमी करतो, प्रतिकारशक्ती वाढवतो. असा हा मध एक चमचा वापरायचा आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह, डायबेटीस, शुगर यांचा त्रास आहे त्यांनी मध वापरू नये. तो तसाच घ्यावा. ज्यांना मधुमेह, डायबेटीस, शुगर नाही त्यांनी मध टाकूनच काढा घ्यावा. याचा परिणाम तुम्हाला चांगला दिसेल. याने छातीतील कफ जळून जाईल. घशाची खरखर थांबेल, प्रतिकार क्षमता वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − eleven =

Close