January 21, 2022

फंगसच्या नव्या स्ट्रेनने दोघांचा मृत्यू

Read Time:2 Minute, 33 Second

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. त्यात आता फंगसच्या नव्या स्ट्रेनने एन्ट्री केली आहे. नवी दिल्ली येथे फंगसच्या नव्या स्ट्रेनचे रूग्ण आढळून आले आहेत. दिल्ली एम्समधील डॉक्टरांनी क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पलमनरी डिजिजने पीडित दोन रूग्णांमध्ये एस्परगिलस लेंटुलस झाल्याची पूष्टी केली आहे. चिंतेची बाब म्हणजे, शर्थिच्या प्रयत्नांनंतरदेखील फंगसच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित दोन्ही रूग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. उपचार सुरू असताना दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाला.

एस्परगिलस लेंटुलस ही एक एस्परगिलस फंगसची एक प्रजाति आहे. ज्यामध्ये फुफ्फुसे संक्रमित होतात. फुफ्फुसांमध्ये संक्रमण होत असल्याने फंगसच्या इतर स्ट्रेनच्या तुलनेत या स्ट्रेनमध्ये मृत्यूदर तुलनेने अधिक आहे. विदेशात अशा प्रकारचे संक्रमण झालेले रूग्ण आढळून आले आहेत. डॉक्टरांच्या मते भारतात या नव्या स्ट्रेनची पहिलीच घटना असू शकते. नव्या प्रकारच्या फंगस स्ट्रेनबाबत पहिल्यांदा २००५ मध्ये भाष्य करण्यात आले होते.

दोन्ही मृतक ४५ वर्षांपेक्षा वयाने अधिक
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या केस रिपोर्टनुसार, ज्या दोन रूग्णांमध्ये फंगसचा नवा स्ट्रेन आढळून आला होता, त्यातील एका रूग्णाचे वय ५० ते ६० वर्ष इतके होते. तर दुस-या रूग्णाचे वय ४५ वर्ष इतके होते. पहिल्या रूग्णावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते, मात्र तेथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला एम्समध्ये भरती करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 3 =

Close