प. बंगाल, महाराष्ट्रात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Read Time:1 Minute, 22 Second

मुंबई/ कोलकाता : दिग्गज गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. हिंदीसह ३६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. यामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारांनी सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

दरम्यान गायिका लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पश्चिम बंगाल सरकार उद्या (७ फेब्रुवारी) अर्धा दिवस सुट्टी पाळणार आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी घोषणा केली आहे. तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × three =