प्रा.मोटेगावकर सरांच्या 11 वी प्रवेशासाठीच्या स्कॉलरशिप परीक्षेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद

हजारो पालक ,विद्यार्थ्यांसह RCC परीक्षा केंद्रावर उपस्थित

प्रतिनिधी : प्रा. शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसीच्या वतीने स्कॉलरशिपच्या माध्यमातून गरिब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्याचे मोठे कार्य मागील 23 वर्षांपासून सुरूच आहे. 10 वीतून 11 वीमध्ये जाणार्‍या डॉक्टर/ इंजिनियर होण्याच्या तयारीसाठी आरसीसीची स्कॉलरशिप सेट परीक्षा रविवार, दि. 7 एप्रिल रोजी पार पडली. या परीक्षेला राज्यातील काणाकोपर्‍यासह बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. लातूर ,नांदेड ,छत्रपती संभाजीनगर ,FC रोड पुणे ,पिंपरी पुणे ,हडपसर ,अकोला,कोल्हापूर ,
नाशिक आणि सोलापूर येथील शाखेमध्ये 25 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवर पार पडली या परीक्षेस हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे एक पाऊल पुढे टाकले आहे.

इयत्ता 10 वीमधून इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर प्रदेशातूनही विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.RCC च्या स्कॉलरशिप परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 11 मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ,म्यॅथेमॅटिक्स विषयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन आर्थिकदृष्टया गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा डॉक्टर / इंजिनियर होण्याचा खडतर मार्ग सुकर करण्याच्या उदात्त हेतूने प्रा मोटेगावकर सरांनी हा उपक्रम राबविला आहे. दरम्यान, दहा शाखेतील विविध नियोजित परीक्षा केंद्रांवर आरसीसी टीमने जावून परीक्षा योग्य रितीने पार पाडली. यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबरोबर आलेल्या पालकांसाठी RCC चा रेकॉर्डब्रेक निकाल ,माहितीपत्रक त्याचबरोबर पालकांना मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आले होते . या परीक्षेचा निकाल 2-3 दिवसात जाहीर होईल .दि. 6 एप्रिलपासून फ्री फाऊंडेशन कोर्ससह 11 वी बॅचची सुरु झाली आहे .विद्यार्थ्यांना शिक्षकांची शिकवण्याची पद्धत ,क्लासचे वातावरण ,नोट्स ई समजण्यासाठी डेमो पासची सुविधाही प्रत्येक शाखेत करण्यात आली आहे. कुठेही प्रवेश घेण्याअगोदर आरसीसी डेमो क्लासेस नक्की करून बघा असे आवाहनही विद्यार्थी व पालकांना व्यवस्थापकाकडून करण्यात आले .आरसीसी ची खरी ताकद म्हणजे टिचिंग ,नोट्स आणि डाऊट क्लिअरींग सिस्टीम आहे तसेच ऑफलाईन अभ्रासक्रमाबरोबर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बॅच सुरु असणार आहेत असेही पालकांशी संवाद साधताना प्रा .मोटेगावकर सरांनी सांगितले .

पालककांशी साधला संवाद


स्कॉलरशिप परीक्षेकरीता महाराष्ट्र राज्यातील काणाकोपर्‍यातून विद्यार्थी व त्यांचे पालक विविध परीक्षा केंद्रांवर हजर झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना त्यांच्यासमवेत आलेल्या पालकांना प्रा .मोटेगावकर सर ,व आरसीसी टीमने क्लास कशा पद्धतीने चालतो?, आगामी नीट परीक्षेला सामोरे जाण्यासाठी काय नियोजन आहे? विद्यार्थ्यांची परिपूर्ण  तयारी कशा पद्धतीने केली जाते? याबाबत पालकांशी संवाद साधला. आरसीसी टीमने पालकांशी संवाद साधल्यानंतर माझा मुलाचे किंवा मुलीचे भवितव्य सुरक्षित हातात आहे असेच जणू पालकांच्या चेहर्‍यावरील दिसणार्‍या समाधानावरून स्पष्ट होत होते.

Share this article:
Previous Post: ढिसाळ नियोजनाने महाभारत एक्सप्रेसमध्ये घडला राडा; वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमुळे लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण बिघडेल काय?

April 6, 2024 - In Uncategorized

Next Post: परस्‍पराच्‍या सण- उत्‍सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या – जिल्‍हाधिकारी

April 7, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.