प्रा. मोटेगावकर यांच्या ‘आरसीसी’ मध्ये नीट, जेईईसाठी मोफत प्रवेशाची संधी

लातूर : प्रतिनिधी
देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या प्रा. मोटेगावकर सरांच्या ‘आरसीसी’ ने १० वीतुन इयत्ता ११ मध्ये जाणा-या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आरसीसी’ मध्ये प्रवेश मिळविण्यासाठीची आरसीसी सेट ही स्कॉलरशिप परीक्षा ही १५ जानेवारी रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल १९ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या परीक्षेसाठीची नोंदणी ‘आरसीसी’ ची वेबसाईट ६६६.१ूूस्रं३३ी१ल्ल.ूङ्मे यावर विनाशुल्क उपलब्ध असल्याची माहिती आरसीसी व्यवस्थापनाने दिली आहे.
मागील तब्बल २२ वर्षांपासून आपल्या गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या बळावर विश्वास, नेत्रदीपक निकाल आणि त्या निकालातील सातत्य देशभरात नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर सरांच्या फउउ तर्फे दरवर्षी महाराष्ट्रातीलच न्हवे तर इतर राज्यातील गुणवंत ,होतकरू, आर्थिक दृष्ट्यादुर्बल असलेल्या पालकांच्या पालकांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करत आले आहे. या परीक्षेसाठी स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांना मेडिकल पीसीबी ग्रुपसाठी इयत्ता १० विज्ञान तर इंजिनियरिंग पीसीएम ग्रुपसाठी १० विज्ञान आणि गणित हे अभ्यासक्रमाचे विषय आहेत. परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची तसेच ३ तासाची असेल. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ आणि विषय एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे. परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध ६० टॉपर विद्यार्थ्यांना एआयआयएमएस बॅच मध्ये प्रवेश मिळणार आहे. याशिवाय टॉपर विद्यार्थी अर्जुना, सुपर फोटॉन, फोटॉन या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या स्पेशल बॅचेस मध्ये प्रवेश मिळणार आहे.
तसेच आयआयटी-जेईईची तयारी करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅचही असणार आहे. तरी लवकरच लवकर‘आरसीसी’ सेट परीक्षेकरिता रजिस्ट्रेशन करुन भविष्यात आपले डॉक्टर-इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाका असे आवाहन फउउ व्यवस्थापनाने केले आहे. ही परीक्षा लातूर, नांदेड, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर, नागपूर, वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, जळगाव, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या केंद्रावर होणार आहे. ‘आरसीसी’ सेट परीक्षेकरिता रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.