प्राचार्या डॉ.बावगे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Read Time:2 Minute, 23 Second

औसा : ग्रामीण भागातील हासेगाव येथील श्री. वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षण व अभ्यासात सातत्य ठेवत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. यासह जनतेत कोरोनावरील उपाययोजना, लसीकरण याकरिता जनजागृती करून महत्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्याची दखल देशपातळीवरील संस्थेने घेऊन हैद्राबाद येथे नुकतेच झालेल्या एक दिवशीय परिषदेत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेंगावच्या प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे यांना स्टार गोल्डन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एका होतकरू महिलेने संकटसमयी प्राचार्यासह आई, बहिण आणि समाजसेविकेची भूमिका बजावली म्हणून त्यांचा गौरव झाल्याने त्यांचे जिल्हाभर कौतुक केले जाते. श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे याही मंच्यावर उपस्थित होत्या . हैद्राबाद येथे देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या २५ जणांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यात डॉ. श्यामलीला बावगे यांचा समावेश होता. या पुरस्काराचे वितरण हैद्राबादचे खासदार वेणुगोपाल चारी,आमदार श्रीनिवास गौड सुमन आर्टचे अध्यक्ष पी. सुमन आणि सचिव प्रतीक के. यांच्या हस्ते करण्यात आले.

याबद्दल वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर गुरुनाथ बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवंिलग जेवळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यानी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − fourteen =