प्रसार माध्यमांना दोष देणारा मुख्याध्यापक जलील खा पठाण पोलिसांनी जेरबंद केला आणखीन तिघांचा शोध सुरू


 

नांदेड,(प्रतिनिधी)-विविध परीक्षांमध्ये गुण वाढवून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणाऱ्या 4 शिक्षकां विरुद्ध एटीएस नांदेडच्या तक्रारीवरून लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात काल प्रसारमाध्यमां विरुद्ध बोलणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक झाली असून अजून तीन जण पकडायचे आहेत.

नांदेड येथील एटीएस विभागातील पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांना फसवून विविध परीक्षांमध्ये तुमचे गुण वाढवून देतो असे म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या आरोपांवर कातपूर जिल्हा लातूर या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या जलील खा उमरखा पठाण यास अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत शिक्षक संजय तुकाराम जाधव, ईरन्ना मसनाजी कोंडुलवार आणि दिल्ली येथील गंगाधर अशा 4 जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. गुन्हा दाखल होताच आज पहाट होण्यापूर्वी पोलिसांनी जलील खा उमरखा पठाण या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे.

लातूर शहरात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा क्रमांक 272 /2024 असा आहे. या गुन्ह्याचा तपास लातूर शहर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक कुंडे हे करणार आहेत. ही सर्व मेहनत नांदेडच्या एटीएस पथकाने घेतल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

शनिवारी जलील खा पठाणला पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे बोलावून चौकशी करण्यात आली होती. नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. रविवारी त्यांनी मला अटक झाली नाही, तरी प्रसार माध्यमे मला अटक झाली, दिल्लीला नेले, माझे घर बंद आहे अशा खोट्या बातम्या देत असल्या बाबत मुलाखत दिली होती. पण अखेर पोलिसांच्या शोधात पहिला क्रमांक अटक होणारा आरोपी म्हणून जलील खा उमरखा पठाण याचाच क्रमांक लागला आहे. नीट परीक्षा असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना पैसे घेऊन त्यांचे मार्क वाढवून देण्याचा धंदा हे 4 शिक्षक चालवत होते. असा आरोप पोलीस प्राथमिकी मध्ये आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांचे गुण मात्र वाढलेले नाहीत पैसे घेण्यात आले आहेत.प्रसार माध्यमांनी या बातम्या देताना घाई केलेलीच आहे .जलील खान पठाणला आज रात्री 12 ते पहाट होण्यापूर्वी अटक झालेली आहे. तरीपण त्यांना अटक झाली अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित करून आम्ही प्रथम क्रमांक आहोत हे दाखवण्यात घाई नक्कीच केलेली आहे.


Post Views: 50


Share this article:
Previous Post: वंचित बहुजन आघाडी 9 विधानसभा लढविणार-बनसोडे

June 23, 2024 - In Uncategorized

Next Post: जनतेतील कोणाला तरी खड्‌ड्यांची लाज वाटली आणि लावला बोर्ड

June 24, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.