प्रभाग २० च्या नगरसेविका मंगला देशमुख यांच्या विकास निधीतील कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

Read Time:3 Minute, 39 Second

नांदेड दि.२३ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग  २० क मधील नगरसेविका माजी स्थायी समिती सभापती सौ.मंगला देशमुख यांच्या विकास निधीतील एक कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंत बांधकामांचे लोकार्पण विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ मंदिर प्रांगणात सकाळी दहा वाजता संपन्न होत आहे.</

सिडको प्रभाग क्रमांक २० क मधील नगरसेविका सौ.मंगला गजानन देशमुख व नगरसेवक प्रतिनिधी ऊदयभाऊ देशमुख यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व आ.अमर राजुरकर व आ.मोहनराव हंबर्डे यांच्या कडे मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत विकासात्मक निधि अंतर्गत पाठपुरावा करून जवळपास एक कोटी रुपयांच्या विकास योजना अंतर्गत निधी उपलब्ध करून घेतला .
२४ फेब्रुवारी रोजी मुलभूत सुविधा योजना अंतर्गत खिलारे यांचे घर ते विनायक पाटील यांच्या घरापर्यंत १५ लक्ष रुपये, डॉ.धोडगे यांच्ये घर ते कच्छवे यांच्या घरा पर्यंत १५ लक्ष रुपयांचा , डॉ. चव्हाण यांच्ये घर ते वरखिंडे यांचे घर २० लक्ष, सिडको येथील एन.डी.२ बेलुरकर यांच्ये घर ते दोमटवार घर १५ लक्ष,वंसत कुलकर्णी ते किशोर देशमुख यांच्या निवासस्थानी १५ लक्ष, श्रीनिवास लोहेकर ते अमरनाथ रुग्णालयात पर्यंत २० लक्ष रुपयांचा सिमेंट क्राकेट रस्त्या तयार करणे भुमिपूजन व जिल्हा परिषद शाळा चा समोरील मोकळ्या जागेतील संरक्षण भिंतीचे बांधकामाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून यावेळी महापौर जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, सभापती स्थायी समिती किशोर स्वामी, वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये प्रभारी तथा पक्षप्रवकते संतोष पांडागळे,सभागृह नेते महेश कनकदंडे, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेवक श्रीनिवास जाधव,माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे,व माजी नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे,प्रा.सौ.ललीता शिंदे,परिसरातील लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मनपाच्या स्थायी समितीचा माजी सभापती तथा नगरसेविका सौ मंगला गजानन देशमुख व युवानेते उदयभाऊ देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × four =