प्रभागरचनेचा बुधवारी फेरविचार?

Read Time:2 Minute, 21 Second

पुणे : मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये अजूनही खलबत सुरू आहे. तीन सदस्यांचा प्रभाग हा कॅबिनेटचा निर्णय असून कोणत्याही पक्षांचा विषय नाही, तरीही काही मतमतांतरे असतील. येत्या बुधवारी यासंदर्भात फेरविचार होऊ शकतो, असे स्पष्ट संकेत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली, अशी चर्चा रंगली होती. या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत. त्यातच आता बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे.

मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असावा, असा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कोणत्याही पक्षांचा विषय नाही. तरीही काही मतमतांतरे असतील. येत्या बुधवारी यासंदर्भात फेरविचार होऊ शकतो, असे थोरात यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यावर विजेचे संकट असले तरी राज्य आम्ही अंधारात जाऊ देणार नाही, आम्ही सक्षम आहोत. विज बिलाची थकबाकी हे वास्तव आहे. त्यामुळे कोळसा खरेदीत अडचणी येत आहेत पण तोही प्रश्न मिटेल, असेही थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 5 =