प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार

Read Time:1 Minute, 24 Second

चंदिगढ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केली. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचे पाऊस पडताना दिसत आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, की जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन झाले तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील. एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 14 =