August 19, 2022

पोलीस निरीक्षक मिर्झा अन्वर बेग यांना राष्ट्रपती पदक

Read Time:2 Minute, 1 Second

नांदेड दि. २५- नांदेड पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक मिर्झा अन्वर बेग यांना पोलीस दलातील उल्लेखनीय राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांचे वाचत असलेले अंवर बेग यांनी पोलीस दलातील सेवेची सुरुवात शिपाई पदापासून करत आज पर्यंत ३८ वर्षे सेवा केली आहे त्यांच्या निष्कलंक सेवा काळातील कार्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवून पोलीस दलाची मान उंचावली आहे .

सन २०१५ साली ही त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळविले होते पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक पदाच्या प्रवासात त्यांनी पोलीस स्टेशन उमरी जिल्हा नांदेड येथून औरंगाबाद विभागातील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग प्रतिबंधक विभाग येथे आपल्या कार्य शैलीचा ठसा उमटवला. सध्या ते नांदेड जिल्हा पोलिस दलात पोलिस निरीक्षक असून जिल्हा पोलिस अधीक्षकांचे वाचक म्हणून कार्यरत आहेत त्यांना दुसऱ्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे विजय कबाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्याच बरोबर जिल्हा पोलिस दलातील सहकारी व मित्र परिवारांनेही त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 − one =

Close