पोलीस कन्येची वास्तुशास्त्रात पीएचडी करण्यासाठी निवड


नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस अंमलदाराच्या मुलीची निवड गुहाटी (आसाम) येथे वास्तुशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) या शिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात भाग्यनगर पोलीस ठाण्यात कमलाकार जायभाये हे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. त्यांच्या कन्या रोहिणी जायभाये यांनी वास्तुशास्त्र विषयात नांदेडच्या ग्रामीण तंत्रनिकेतनमधून पदविका प्राप्त केली. त्यानंतर जेआयए नागपूर या संस्थेमधून त्यांनी वास्तुशास्त्र या विषयात पदवी मिळवली. वास्तुशास्त्र विषयात पद्‌व्युत्तर शिक्षण रोहिणी जायभाये एनआयटी भोपाळ येथे घेतले आणि आता त्यांची निवड भारतीय प्रोद्योगिकी संस्था गुहाटी (आसाम) येथे निवड झाली आहे. पोलीस अंमलदाराच्या आपत्यांमध्ये पीएचडी शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या रोहिणी जायभाये या बहुदा पहिल्याच विद्यार्थीनी आहेत.


Share this article:
Previous Post: लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब व पुनर्मेळ खर्चाबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

June 30, 2024 - In Uncategorized

Next Post: दुषीत पाणी पुरवठ्यामुळे 130 जणांना बाधा – VastavNEWSLive.com

June 30, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.