पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा


अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या शपथेचे सामुहिक वाचन
नांदेड,(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राजश्री शाहु महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली.
आज 26 जून राजर्षी शाहु महाराजांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी राजर्षी शाहु महाराजांना पुष्पहार अर्पण अभिवादन केले. याप्रसंगी सर्व विभागातील अधिकारी व व पोलीस अंमलदार उपस्थिती होते.
आज अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. या संदर्भाची शपथ स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड यांनी वाचली. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित सर्वांनी अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथक सामुहिकरित्या पठण केली. या कार्यक्रमात पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरिक्षक त्रिलोचनसिंघ सोहल, स्थानिक गुन्हा शाखा, जिल्हा विशेष शाखा, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर यांनी उत्कृष्टरित्या केले.


Post Views: 10


Share this article:
Previous Post: कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – VastavNEWSLive.com

June 25, 2024 - In Uncategorized

Next Post: अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या सहा जणांना अटक – VastavNEWSLive.com

June 26, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.