August 19, 2022

पोलिस अधिका-यांविरोधातही कारवाई करणार

Read Time:2 Minute, 19 Second

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर हल्ला करणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जबाबदार असणा-या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित पोलिस अधिका-यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंसक आंदोलक करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणा-यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणा-यांविरोधात कारवाई होईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. त्याचबरोबर या आंदोलनाची पूर्वकल्पना न मिळाल्याने इंटेलिजन्स फेल्युअरचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे संबंधित पोलिस अधिका-यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, आता आंदोलक एसटी कर्मचा-यांनी राज्य सरकारला सहकार्य करावे. त्यांनी आता शांतता राखावी, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. एसटी कर्मचा-यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझी हत्या होऊ शकते.त्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील जबाबदार असतील, हा त्यांचा आरोप फेटाळून लावला. या प्रकरणी कायदेशीर मार्गाने निर्णय होईल. सदावर्ते यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यांना आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याची सवय आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 + five =

Close