पोलिसांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करा, समर्पण प्रतिष्ठानचे नांदेडला धरणे आंदोलन

Read Time:2 Minute, 25 Second

नांदेड दि.२८-  शिक्षक मतदार संघाप्रमाणे पोलिसांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करावी यासह अन्य मागण्यांसाठी समर्पण प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  समर्पण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर केंद्रे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

शिस्त हा पोलिस दलाचा कणा असला तरीही शिस्तीच्या नावाखाली अनेक बंधने लादून पोलिसांना अन्यायकारक वागणूक दिली जाते यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचुन आत्महत्येसारखे मार्ग अवलंबावे लागतात आज पर्यंत जिल्ह्यातील अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध संघटना असल्या तरी सामान्य पोलिसांना मिळण्याच्या दृष्टीने कोणतेही संघटन नाही विभागाच्या सेवारत पोलिसावर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने शिक्षक मतदार संघ प्रमाणेच पोलीस मतदार संघाची निर्मिती करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जुनी पेन्शन योजना लागू करा त्याचबरोबर सन १९९५ च्या शासन निर्णया नुसार पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार २५ टक्के आरक्षण अबाधित ठेवावे या मागण्याही निवेदनाद्वारे केली आहे .

धरणे आंदोलनात समर्पण प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांसह एस एन होनराव, जी जे भंडारे, एन बी हटकर, के आर राठोड, यु.एल.कांबळे, शामराव नौबतकर, गौतम गायकवाड, व्ही डी उजेडकर आदी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सामील झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 4 =