August 9, 2022

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या १८ जणांना १२ दिवसांची पोलिस कोठडी

Read Time:4 Minute, 9 Second

पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणी अटक केलेल्या १९ आरोपींपैकी १८ आरोपींना येथील मुख्य न्यायाधिकारी सतीश हिवाळे यांनी बुधवारी (ता. ३१) १२ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. अन्य आरोपींना लवकरच अटक करु असा विश्वास पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.

ता. २९ मार्च रोजी हल्ला महल्ला मिरवणुकीदरम्यान काही युवकांनी पोलिसांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस अमलदार तथा पोलिस अधीक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव आणि श्री. शिंदे यांच्यासह अनेक पोलिस जखमी झाले होते. यामध्ये विक्रांत गायकवाड यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर दिनेश पांडे यांच्या पाठीत तलवारीचा जबर वार बसला आहे. तसेच अजय यादव यांचे डोके फुटले असून अनेक पोलिस कर्मचारी यात जखमी झाले. गंभीर जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या हल्ल्यात पोलिसांच्या जवळपास आठ वाहनांची प्रंचड नासधूस करण्यात आली होती. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात एक गुन्हा संत बाबाजींच्या सेवादाराल मारहाण झाल्याचाही आहे.

हे आहेत पोलिस कोठडीत

 1. हरनेकसिंग मुन्नासिंग तोपची (वय 23) राहणार चिखलवाडी,
 2. अमरजीतसिंग उर्फ राजू बसंतसिंग महाजन (वय ५२) राहणार गुरुद्वारा गेट नंबर चार,
 3. कश्मीरसिंग प्रेमसिंग हांडी (वय ५७) राहणार गुरुद्वारा गेट नंबर पाच,
 4. मनिंदरसिंग जयपालसिंग लांगरी (वय २४) राहणार गुरुद्वारा गेट नंबर एक,
 5. सुखासिंग भगवानसिंग बावरी (वय ३१) राहणार नवीन कौठा,
 6. इंदरसिंग उर्फ बबलू लोचनसिंग भट्टी (वय २८) राहणार अबचलनगर,
 7. जसवंतसिंग उर्फ चन्नु किशनसिंग सरपलल्लीवाले (वय २०) राहणार नंदीग्राम सोसायटी,
 8. विक्रमसिंग हरभजनसिंग सेवादार (वय २५) राहणार गुरुद्वारा गेट नंबर एक,
 9. परमजीतसिंग सरदारसिंग पुजारी (वय ४५),
 10. अभिजीतसिंग राजपालसिंग सरदार (वय २८) राहणार गुरुद्वारा गेट नंबर सहा,
 11. अजितपालसिंग प्रीतपालसिंग (वय ४३),
 12. हरभजनसिंग देवासिंग पहरेदार (वय ५८) राहणार गुरुद्वारा गेट नंबर एक,
 13. बलवंतसिंग सुलतानसिंग टाक,
 14. हरप्रीतसिंग उर्फ कालू रणजीतसिंग ग्रेवाल,
 15. सुदर्शनसिंग कुलवंतसिंग शाहू,
 16. जगतजीतसिंग उर्फ राजा भगवानसिंग घडीसाज,
 17. ललकारसिंग पूनमसिंग जुन्नी आणि
 18. राणासिंग मायासिंग टाक

या १८ जणांना अटक करण्यात आली होती. या सर्व अटकेतील आरोपींना वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी (ता. ३१) मार्च रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले. मुख्य न्यायाधीश सतिश हिवाळे यांनी १८ जणांना ता. १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − six =

Close