पोरींचा कॉलेजमध्ये राडा, केस ओढत एकमेकींना धू-धू धुतलं, पाहा व्हिडीओ

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 44 Second

नाशिक | भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. गल्लीबोळात भांडताना, रस्त्यावर भांडताना, बाजारात भांडताना. पण हे बरेच व्हिडीओ मुलांचे असतात, माणसांचे असतात. पण सध्या कॉलेजमधल्या पोरींचा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नाशिकच्या (Nashik )गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. यात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisements

व्हिडीओमध्ये तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. यात त्या एकमेकींना केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत.

या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. व्हिडीओमध्ये चार तरुणी दिसतात. यातील दोघी एकमेकींचे केस ओढून हाणामारी करत आहेत. तर, इतर दोघी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *