August 9, 2022

“पोटभर खायला अन्न नाही आणि म्हणे योगा करा” सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी लगावले बोल

Read Time:2 Minute, 27 Second

आज २१ जुन रोजी संपूर्ण जगात योगदिन साजरा केला जातो. जगभर योगाचा प्रसार केला जातो. निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व विषद केले जातात. भाजपा सरकारकडून योगदिनाचा ग्रॅंण्ड ईव्हेंट केला जातो. मात्र ईथे पोटभर खायला अन्न नाही आणि म्हणे निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी योगा करा असे म्हणत सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेत काटजु यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

मार्कंडेय काटजु यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. जनसत्ता वृत्तपत्रात लिहीलेल्या लेखात त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

देशात कुपोषनाने कहर केलाय, महिलांमध्ते अॅनिमीकचे प्रमाण वाढत आहे. बेरोजगारी रोज नवे विक्रम गाठत आहे. अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले असतांना हे योगदिन वगैरे साजरे करणे म्हणजव सर्व नौटंकी असल्याची टीका त्यांनी केली आहे.

योगाने आरोग्य सुधारते, मन शांत राहते. मात्र गरीब, ऊपाशी, बेरोजगार असणार्‍या व्यक्तींचे खरोखरच मन शांत होणार का? असा प्रश्न त्यांनी केला. अनेकांना वाटत मी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, दिवाळी, होळी यांच्याही विरोधात आहे. मात्र मी कुठल्याही ऊत्सवाच्या विरोधात नसून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्यांचा वापर करणार्‍यांच्या विरोधात असल्याचे काटजु यांनी म्हटले.

मार्कंडेय काटजु हे देशातील विविध विषयांवर लिहीत असतात. काटजुंनी मोदी सरकारला पहिल्यांदाच लक्ष केले नसून याअगोदरसुद्धा अनेकवेळा मार्कंडेय काटजु यांनी मोदी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + fourteen =

Close