पोकलेंडने खोदकाम करतांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जलवाहिनी फोडली


नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या वजिराबाद भागात सुरू असलेल्या एका बांधकामावर पोकलेंडच्या मााध्यमातून खोदकाम करतांना त्या पोकलेंडने जलवाहिनी तोडली आहे. शहरात अगोदरच पाण्याची टंचाई आहे.
महानगरपालिकेने कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली तर त्याच्या काही नियमावली आहेत. आणि त्यानियमावली नुसार काम कज्ञाज चालते की नाही हे पाहण्यासाठी महानगरपालिकेने अत्यंत कुशल अधिकारी आणि कर्मचारी नेमले आहेत. तरीपण काही विशेष लोकांच्या बाांधकामांकडे महानगरपालिका दुर्लेक्षच करते. अशाच प्रकारचे एक बांधकाम नांदेड शहराचा ऱ्हदय मानल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या कार्यालयापासून जवळच असणाऱ्या ठिकाणी सुरु आहे. आज सायंकाळी या बांधकामाजवळ रस्त्यालगत, पादचारी रस्त्याच्या शेजारी एक पोकलेंड खोदकाम करत असतांना त्या कामाच्या खाली असलेली पाणी पुरवठा वाहिनी सुटली. त्यातून किती पाणी वाहुने गेले त्याची तर माहिती नाही परंतू उडणारा पाण्याचा फोवारा छायाचित्रात दिसतो आहे. शहरात अगोदरच पाण्याची टंचाई आहे आणि अशा पध्दतीने बांधकामामुळे जलवाहिन्या फोडल्या जातील तर त्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा महानगरपालिकेलाच खर्च करावा लागतो. कारण आज फुटलेल्या जलवाहिनीला त्या पोकलेंड सोबत असलेल्या सहाय्यकांनी कसे तरी बंद करु टाकलेले दिसते. पण ते बंद केलेले पाणी अथवा ती फुटलेली जलवाहिनी कायम स्वरुपी दुरूस्त झाली असे म्हणता येणार नाही.


Post Views: 33


Share this article:
Previous Post: नखेगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेचा खूनच; महिला गर्भवती होती

June 12, 2024 - In Uncategorized

Next Post: सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा

June 12, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.