January 19, 2022

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार

Read Time:3 Minute, 42 Second

नवी दिल्ली : गेल्या काही तेरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असे असले तरी बहुतांश ठिकाणी पेट्रोल ११० रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे तर डिझेल ९८ ते १०० रुपये प्रति लीटरच्या जवळपास आहे. दरम्यान सामान्यांच्या खिशाला यामुळे चाप बसत आहे. या परिस्थितीत सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर वाढल्यास तेल मार्केटिंग कंपन्यांवर मार्जिनचा दबाव वाढू सकतो. येणा-या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तेजी येऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे सरासरी दर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत प्रति बॅरेल चार ते सहा डॉलर्सनी अधिक आहेत. असे असले तरी अद्याप किरकोळ किंमतीत वाढ झालेली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या स्तरावरच इंधनाचे दर राहिले तर तेल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझलचे किरकोळ दर वाढवू शकतात. त्यामुळे सामान्यांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.

सध्याचे दर शंभराच्यावरच
पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती अनुक्रमे १७ जुलै आणि १५ जुलै रोजी वाढल्या होत्या. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर १०१.१९ रुपये आणि डिझेलचे दर ८८.६२ रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल १०७.२६ रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल ९६.१९ रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.

डेल्टाचा किंमतीवर परिणाम?
जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ३ डॉलरपेक्षा जास्त घसरल्या होत्या. अमेरिका आणि चीनकडून मिळालेल्या मिश्र आर्थिक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर आणि वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरिएंटमुळे आशियातील हालचालींवर निर्बंध आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय दर ७५ डॉलर्सच्या वर
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची घसरण ५ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील ताज्या घडामोडींनुसार, कच्च्या तेलाच्या किमती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सतत वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेलाची वायदे किंमत शुक्रवारी किरकोळ घसरून ७५.०२ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 3 =

Close