August 19, 2022

पॅराशूट कंपनीचे बनावट उत्पादने विक्री केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा

Read Time:2 Minute, 51 Second

नांदेड :- (ता.नायगाव) पॅराशूट कंपनीचे बनावट उत्पादने विक्री केल्याप्रकरणी नायगाव येथील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या विरोधात सोमवारी (ता.दोन) गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांनी अन्य काही व्यापाऱ्यांच्या मदतीने बनावट उत्पादन विकण्याचे तालुकाभर जाळे निर्माण केले असल्याची जोरदार चर्चा होत आहे. कारवाईची चर्चा शहरभर पसरल्याने काही वेळातच बनावट उत्पादने दुकानातून गायब करण्यात आले हे विशेष. नायगाव शहरातील एक व्यापारी अनेक नामांकित कंपनीचे बनावट उत्पादने दुसऱ्या राज्यातून मागवून काही लोकांच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षांपासून विक्री करत असल्याची चर्चा होती. पण याबाबत एकाही कंपनीने पुढे येऊन कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी पॅराशूट तेलाच्या नावाखाली नायगाव शहरात बनावट उत्पादन विकत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यामुळे कंपनीने पाळत ठेवून शहरातील काही दुकानातून हे उत्पादन विकत घेतले व त्याची खात्री केली.

यात नाव साधर्म्य असलेल्या कंपनीकडून तीन व्यापारी बनावट उत्पादन विकत असल्याचे आढळून आले. मैत्रिका कन्सल्टींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सिद्धेश सुभाष शिर्के यांनी सोमवारी (ता.दोन) नायगाव पोलिसांना सोबत घेऊन व्यंकटेश प्रोव्हिजन स्टोअर्ससह अन्य काही दुकांनाची झाडाझडती घेतली. यात व्यंकटेश प्रोव्हिजनचे अनिल विठ्ठल गादेवार यांच्यासह प्रकाश अनंतराव कवटीकवार आणि अनिल बाबूराव कोटलवार हे मैत्रिकाचे पॅराशूट तेलाचे बनावट उत्पादन दुकानात ठेवून विक्री करतांना आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा सदर प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात वरील तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

#amhinandedkar #nandedcity #nandednews
#nandedkar #MH26 #Nanded #नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + 5 =

Close