पूजा राणीची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

Read Time:1 Minute, 34 Second

मुंबई : भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. पाच पंचांनी पूजाला १० पैकी १० गुण दिले. पूजा ७५ किलो वजनी गटात खेळत आहे. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.

आशियाई चॅम्पियन आणि या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने २० वर्षीय इचार्कला ५-० असे सहज हरवले. पूजाने तिच्या अनुभवाचा उपयोग करत इचार्क आणि सामन्यावर नियंत्रण राखले. या सामन्यात पूजाने संयम दाखवत नवख्या इचार्कला गुण मिळवण्याची संधी दिली नाही.

३० वर्षीय पूजा तिच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. मे महिन्यात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी मार्चमध्ये तिने विश्वविजेती अथेन्या बायलनवर सरशी साधली होती. या बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − fourteen =