पूजा-अर्चा करताना डोकं झाकणं का गरजेचं आहे?; जाणून घ्या खरं कारण…

Read Time:3 Minute, 34 Second


नवी दिल्ली | हिंदू धर्मात पूजा-अर्चेला (Worship) महत्व दिलं जातं. अनेक जण आपल्या परिने आणि श्रद्धेने देवी देवतांचं स्मरण, पूजा, अर्चा करत असतात. कोणी उपवास करतं. कोणी माळ जपतं. कोणी पायी चालत जातं. कोणी डोळे झाकून पूजा करतं तर कोणी डोक्यावर पदर घेऊन करतं.

अनेकदा आपण देवाला नमस्कार करताना दोन हात जोडून नमस्कार करतो. काहीजण अगदी खाली डोकं (Head) टेकून नमस्कार करतात. काहीजण सांष्टाग नमस्कार घालतात.

आपले नमस्कार करण्याचे अनेक प्रकार आहेत. आपण जे आध्यात्म करतो त्याच्या मागेही अनेक कारणं असतात. म्हणजे हात जोडल्यानंतर सकारात्मक ऊर्जा (positive energy) येते असं म्हणतात.

अनेकदा तुम्ही जर पाहिलं असेल तर स्त्री (Women) असो किंवा पुरुष (Men) देवळात जाताना अनेकदा डोकं झाकतात. स्त्री साडीचा पदर डोक्यावर घेते तर पुरुष रुमाल बांधतात.

पूजा अर्चा करताना डोकं झाकलं जातं. यामागेही एक कारण आहे. पूजा-अर्चा करताना डोकं झाकणं का गरजेचं आहे हे आपणं जाणून घेऊ. अनेक काही कारणं(Reason) सांगितली जातात. त्यापैकी काही कारणं जाणून घेऊ.

आपण नमस्कार करत असताना आपल्या मनात अनेक विचार येतात. आजुबाजूला लक्ष जातं आणि धान्यात लक्ष लागत नाही. शास्त्रानुसार माणसाचे मन चंचल (fickle) असते. अशा स्थितीत डोके झाकून त्याचे संपूर्ण लक्ष पूजेत होते आणि लक्ष भटकत नाही.

आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते.  जे केसांद्वारे व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते. डोकं बांधल असता केस झाकलं जात.जेणेकरून व्यक्तीच्या मनात फक्त सकारात्मक विचार (positive energy) येतात.

माणसाच्या डोक्यावर नेहमीच आभाळाच (Sky) छप्पर असतं. त्यामुळं असे मानले जाते की आकाशातून अनेक लाटा बाहेर पडत असतात. पूजा करताना डोके उघडे असल्यास आकाशीय विद्युत लहरी थेट व्यक्तीच्या आत प्रवेश करतात, ज्यामुळे व्यक्तीला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेही डोकं झाकण्याचा सल्ला दिला जातो.

अनेकांना केस गळणे (hair loss) किंवा कोंडा (dandruff) होण्याची समस्या असते. अचानक पूजा सुरु असताना केस खाली पडू शकतात. यामुळे अशुद्धता होण्याची शक्यता असल्याने डोकं झाकण्याचा सल्ला दिला जातो.

थोडक्यात बातम्या

‘…म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागू नका’; भाजप नेत्याचा विरोधकांना इशारा

IRCTC Thailand Tour Package | आता थायलंड फिरा अत्यंत कमी पैशात, IRCTC देतंय सुवर्णसंधी

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve + 13 =