
‘पुष्पवल्ली’ फेम अभिज्ञा भावेचा नवरा झाला कॅन्सरमुक्त
मुंबई : सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत पुष्पवल्लीच्या भूमिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून खासगी आयुष्यात मोठ्या संकटाला ती सामोरी जाते आहे. अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पैला कर्करोग झाला होता. मात्र आता त्याने यशस्वीरीत्या कर्करोगावर मात केली आहे. नुकताच मेहुलचा बदललेला लूक समोर आला आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावे मेहुल पैसोबत जानेवारी २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. अभिज्ञाच्या नव-याला कर्करोग झाल्याचे निदान झाले.
आता मेहुल पैची तब्येत पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे. त्याची तब्येत उत्तम आहे आणि सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे.
मेहुल पै आता कामावर परतला असून तो स्वत:ची काळजी घेतो आहे, पथ्य पाळत आहे, असे अभिज्ञा भावेने एका मुलाखतीत सांगितले होते.
अभिज्ञा भावे आणि मेहुल पै सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. नुकताच मेहुलच्या ट्रिटमेंटनंतरचा बदललेला लूक समोर आला आहे. आधीचा मेहुल आणि ट्रिटमेंटनंतरच्या मेहुलला पाहून चाहते चकित झाले आहेत.
अभिज्ञा भावे हिने अगदी मेहुलच्या ट्रिटमेंट दरम्यानचे सकारात्मक फोटो आणि व्हीडीओ सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे त्याची होणारी प्रगती पाहून चाहत्यांनी आनंद आणि प्रेम व्यक्त केले आहे.अभिज्ञा आणि मेहुलने आलेल्या संकटावर एकमेकांना खंबीरपणे साथ देत त्याचा सामना केला आहे.