January 19, 2022

पुरात अडकलेल्या ८७ नागरिकांची सुखरुप सुटका

Read Time:3 Minute, 30 Second

लातूर : जिल्ह्यात दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पाटबंधारे विभागाकडून मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या विसर्गातील पाण्यामुळे पूर परिस्थितीबाबत प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे. बचाव पथकाने पोहरेगाव येथील ३ व्यक्तींची हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली. अडकलेले ४६ तर ७ कुटूंबियाचे स्थलांतर करण्यात आले असून वाहून गेलेल्या दोघांचा शोध कार्य सुरू आहे. बचाव पथकाने आतापर्यंत ८७ नागरिकांची सुखरुप सुटका केली आहे.

जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पूरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका, बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशीनसह इतर पूरासंबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. दि. २८ व २९ सप्टेंबर रोजी सुटका केलेले गावाचे नाव, पथक प्रमुख / संपर्क क्रमांक, सुखरुप सुटका केलेले/स्थलांतर केलेले व्यक्तींची माहिती पूढीलप्रमाणे आहे. सारसा ता. लातूर येथील कासले संपर्क क्र. ९९७५७१९९२९ व्यक्ती-५२, घनसरगाव ता. रेणापूर राठोड- मो. क्र. ८४५९४८२२८७ व्यक्ती- २, डिगोळ देशमुख ता. रेणापूर- श्ािंदे- मो. क्र. ९९७५१४३१०१ / ९०११०३२४३३ व्यक्ती -४ पशुधन-१२ ते १५, हंचनाळ ता. निलंगा येथे तहसीलदार निलंगा – ३ कुटुंबातील १२ व्यक्तींना तर बसपूर ता. निलंगा येथील तहसीलदार निलंगा- ३ कुटुंबातील १२ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

पोहरेगाव ता. रेणापूर येथील हेलिकॉप्टरव्दारे ३ व्यक्तींची सुखरुप सुटका, टाकळी बु. ता. लातूर येथील श्री. शिंदे – मो. क्र. ९९७५१४३१०१ / ९०११०३२४३३ एकूण २५ व्यक्तींची सुखरुप सुटका मसलगा ता. निलंगा येथील तहसीलदार निलंगा- १ व्यक्तींची सुटका केली. पूरात अडकलेल्या व्यक्तींची माहिती पुढील प्रमाणे – आरजखेडा ता. रेणापूर एनडीआरएफ टिम- अडकेलेल्या ४० व्यक्ती, शिवणी ता.औसा येथील तहसीलदार औसा ६ व्यक्ती. पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींचा तपशील पुढील प्रमाणे आहे. मौजे टिपराळ ता. शिरुर अनंतपाळ येथील सुनिल राम शेवाळे, रा. चवन हिप्परगाव ता.देवणी येथील वय वर्ष -२७ , मौजे विळेगाव ता. अहमदपूर येथील गंगाराम सोपान तरुडे वय वर्ष – ३७ स्थानिक प्रशासनाकडून शोध कार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 4 =

Close