पुरग्रस्त भागाला तातडीने मदत करा, वंचित बहुजन आघाडीचे कारंहा तहसीलला निवेदन

Read Time:1 Minute, 4 Second

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुर आणि दरडी कोसळल्याने अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला. अनेकांची संसारं ऊघड्यावर आली. त्यामुळे राज्य सरकारने वेगाने सर्वेक्षणे करत तातडीने पुरग्रस्त भागांस मदत करावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कारंहा तहसिलला सादर करण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रा. आरे सर, वाशिम जिल्हा सचिव राजाभाऊ चव्हान,कारंजा तालुकाध्यक्ष भारत भगत, तालुका प्रवक्ता सुमेध भगत, शहराध्यक्ष सचिन खांडेकर यांच्यसह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + eleven =