पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवरुन राजकारण! फडणवीस म्हणाले “… तर २०-३० रुपयांनी कमी होतील इंधनाचे दर”

Read Time:1 Minute, 57 Second

पेट्रोल-डीझेलवरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण तापत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. मात्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर विरोधी भूमिका घेतली आहे.

यावरुन राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. पेट्रोल-डीझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास २०-३० रुपयांनी ईंधनाचे दर कमी होतील व त्यामुळे जनतेला दिलासा मिळेल. मात्र राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा ऊघडा पडला ते केंद्र सरकारच्या या धोरणांस विरोध दर्शवत आहेत.

एकीकडे ईंधनदरवाढीवरुन ओरडत राहायचे आणि दुसरीकडे त्यावर केंद्र सरकारने चांगला मार्ग शोधला तर त्यालासुद्धा विरोध करायचा ही राज्य सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.

ईंधनाच्या करावर केंद्र सरकारने वेगळी भुमिका घेतल्यास त्याठिकाणी राज्याची मतं मांडतांना काही गोष्टी घडू शकतात. राज्य सरकारचे कर लागू करण्याचे अधिकार कमी करण्याचा विचार झाल्यास आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडू. मात्र यापेक्षा जे सुरु आहे तेच सुरु राहू द्यावे असे ऊपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen + 14 =