पुण्यात आता उडत्या बस!, Nitin Gadkari यांनी सांगितली भन्नाट योजना

Read Time:1 Minute, 40 Second


पुणे | पुण्यात सध्या वाहतुकीचे प्रंचड प्रश्न उपस्थित होत आहेत. ट्रॅफिकमुळे पुणेकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. यावर पुणे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असतात. यातच आता केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी ( Nitin Gadkari )यांनी एक जबरदस्त अशी कल्पना सूचवली आहे.

वाढत्या ट्रॅफिक आणि नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन पुण्यात जर उडत्या बसची (Flying bus) योजना आणली तर त्याचा फायदा नागरिकांना होईल, असं वक्तव्य गडकरींनी केलं आहे. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुुधारण्यासाठी काम सुरु असल्याचंही गडकरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यासाठी आम्ही 165 रोप वे ( Rope Way) केबल कार बांधत आहोत. वरच्यावरुन वाहतूक गेली, तर त्याचा फायदा होईल. ईलेक्ट्रीक बसची (Electric bus) किंमत सव्वाकोटी तर ट्रालीबसची (trolleybus) किंमत 60 लाख आहे. पुणे पालिकेनं योजना तयार केल्यास आम्ही पैसे देऊ शकतो, असं पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी यांनी जाहीर केलं.
Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − nine =