पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद

पुणे : वाढत्या ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येमुळे पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी ४ वाजता घेतला जाणार आहे.
कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख आयएस चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता १ ते ९ पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.