पुण्याच्या नगरसेवकाच्या ‘त्या’ मागणीबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 52 Second


मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील(Marathi Film Industry) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit). तिनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तेजस्विनीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Advertisements

नुकताच तेजस्विनी फार वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

एका पाॅडकास्टला मुलाखत देताना ती म्हणाली की, 2009-2010 च्या आसपासची गोष्ट असेल. आम्ही पुण्यात सिंहगड रस्त्यावर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचो. ते अपार्टमेंट एका नगरसेवकाचे होते. त्या वेळेस माझे एक-दोन चित्रपटच रिलीज झाले होते.

पुढ ती असंही म्हणाली की, मी भाडं देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या ऑफीसला गेली असता त्यानं मला ऑफर दिली. पण मी ऐकून न घेता टेबलावरील पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर फेकला. परंतु हे सांगताना तिनं त्या नगरसेवकाचं नाव घेणं टाळलं.

मी अशा गोष्टी करण्यासाठी कला क्षेत्रात आले नाही, नाहीतर मी भाड्याच्या घरात राहिले नसते, मी घर आणि घरासमोर गाड्या उभ्या केल्या असत्या, असं तिनं त्या नगरसेवकाला सुनावलं होतं, असंही तिनं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *