पीकविमा कंपन्याच्या बाबतीत देशभरात बोंबाबोंब

Read Time:5 Minute, 30 Second

अर्धापूर : नांदेड जिल्ह्यातील ८१ महसूल मंडळातही प्रचंड अतिवृष्टी झाली असून गेल्या १५ वषार्नंतर प्रचंड पाऊस झाला आहे. या पावसाचा शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर अनेकांच्या घराची पडझड, शेतक-यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तर अगोदरच पंचवीस टक्के नुकसान झाली असून आता तर या अतिवृष्टीमुळे पाहण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. शेतक-यांचे जवळपास शंभर टक्केच नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तक्रारी अर्ज दाखल करण्यासाठी कधी अ‍ॅप चालू कधी तर कधी बंद असल्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. अशा अनेक तक्रारी आहेत. त्यातच विमा कंपनीच्या बाबतीत मात्र माझा व्यक्तीगत अनुभव चांगला नाही. राज्यभर आणि देशभरात सुद्धा पिकविमा कंपनीच्या बाबतीत बोंबाबोंबच आहे. अशी नाराजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक यांनी अधार्पूर तालुक्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करताना दि. १० सप्टेंबर रोजी शेलगांव येथे व्यक्त केली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे शुक्रवारी अधार्पूर तालुक्यातील अतिवृष्टीमूळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी शेलगांव येथे आले होते. येथील पिकाची पाहणी करून त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतक-यांच्या शेतातील नुकसानी बाबतची माहिती ७२ तासाच्या आत विमा कंपनीला द्यावी असे सांगण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात विद्युत खंडीत होणे, ऑनलाईन न चालणे, नेट बंद अशा अनंत अडचणी शेतक-यांना आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ग्रामस्तरावरील कर्मचा-यांमार्फत पिकविम्याचे तक्रारी अर्ज स्विकारण्याची व्यवस्था करण्यात यावी. अगोदरच शेतक-यांच्या पिकाचे २५ टक्के नुकसान झाले आहे. त्यातच हे अतिवृष्टीचे भयंकर संकट निर्माण झाले. त्यामुळे संपूर्ण पिकासह शेतजमीन खरडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतात पाहण्यासारखे काय राहिले आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५७७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. इतक्या क्षेत्राची पाहणी करणेही सोपे काम नाही. त्यामुळे ड्रोन कमे-याच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जिल्ह्याला जास्तीत विमा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे अश्वासन मंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी शेतक-यांना दिले. पण शेवटी विमा मंजूर करणे हे विमा कंपनीच्या हातात असते. असे नकारात्मक वक्तव्य सुध्दा त्यांनी केले. आणि शेलगाव या गावाला पयार्यी रस्ता करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, सांगवी – खडकी, मेंढला या गावासह अनेक गावांना मंत्री अशोकराव चव्हाण यांनी भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी विलास माने, तहसीलदार सुजित नरहरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, संजय देशमुख लहानकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, अधार्पूर तालुकाध्यक्ष बालासाहेब गव्हाणे, शंकरराव राजेगोरे, उद्धवराव राजेगोरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजेगोरे, यशवंत राजेगोरे, मदन देशमुख, बाबुराव राजेगोरे, आत्माराम राजेगोरे, ज्ञानेश्वर राजेगोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लोणे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 4 =