May 19, 2022

पार्डी रस्त्यावर जिलेटीनच्या जीपचा भिषण स्फोट

Read Time:5 Minute, 51 Second

नांदेड : जिलेटिनच्या कांडया घेऊन जाणारी जीप उलटून झालेल्या अपघातात भिषण स्फोट झाला. यात जीपच्या चिंधड्या उड्याल्या. या स्फोटाने संपुर्ण मुदखेड शहर हादरून गेले.तर स्फोटाच्या ठिकाणी जमिनीत जवळपास विस फुटाचा खड्डा पडला.ही घटना मंगळवार दि.१ जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास मुदखेड-पार्डी रस्त्यावर घडली.या स्फोटानंतर जीपचा चालक फरार झाला आहे.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी स्फोटामुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

भोकर येथून मुदखेड मार्गे वैजापूर पार्डी रस्त्याने क्रमांक एमएच २६ एच ०३५८ ही पिकअप जीप जिलेटीन घेवून मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास मारतळयाकडे जात होती.यावेळी जीपचे मागील चाक निघुन पडले आणि काही कळायच्या आत सदर जीप उलटून मोठा स्पोट झाला. यात वाहनाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या.स्पोट झालेल्या ठिकाणी जवळपास १० फु ट खोल खड्डा पडला आहे. अपघात झाला तेव्हा जीपचा चालक अडकला होता. त्यावेळी जवळच असलेल्या काही शेतक-यांनी या गाडीतून चालकास सुखरुप बाहेर काढले. त्यावेळी चालकाच्या लक्षात आले की गाडीमध्ये असलेले जिलेटीन आता पेट घेतात तेव्हा ताबडतोब या चालकाने शेतक-यांना व परिसरातील लोकांना दूर जाण्यास सांगितले.यानंतर काही वेळातच जीपचा मोठा स्फोट झाला. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. तर परिसरामध्ये असलेल्या शेतक-यांच्या आखाड्यावरचे पत्रे व बांधकाम केलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले.

तर घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या बाळू गोडवान या शेतक-यास स्फोटात उडालेले दगड लागून तो जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर चालक फरार झाला .स्फोटाची माहिती जिल्ह्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, भोकरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळाची पाहणी केली.यानंतर पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या. दरम्यान या स्फोटांमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या की अन्य कोणते स्फोटक पदार्थ होते हे माहिती करून घेण्यासाठी श्वानपथक व सदरील जागेवरचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर जिलेटीनचा साठा कोणत्या कामासाठी व कुठे नेण्यात येत होती. हे अद्याप स्पष्ट झाले नसून वाहन चालकाचा शोध लागल्या नंतर या घटनेचा पुढील उलघडा होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. जिलेटीन नेण्यासाठी परवानगी काढण्यात आली होती का व हे नेमके कोणत्या कारणासाठी वापरण्यात येत होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेतील स्फोटामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी प्रचंड मोठया आवाजात झालेल्या या स्फोटामुळे मुदखेड परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

मुदखेड शहरामध्ये उमरी रस्त्यावर सीआरपीएफ केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या वस्तीमध्ये एका राजस्थानी व्यक्तीचे गोदाम असून या ठिकाणी ब्लास्टिंग करणा-या अनेक गाड्या दररोज रात्रीला उभ्या असतात. या राजस्थानी व्यक्तीकडे जिलेटिनचा प्रचंड साठा आढळून येतो. या व्यक्तीकडे जिलेटिन बाळगण्याची क्षमता किती आहे व तो जिलेटिन व स्फोटक पदार्थ किती प्रमाणात साठवणूक करुन ठेवतो याची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.

जिलेटीन घेऊन जाणा-या जीपचे मागील चाक निघुन पडले आणि काही कळायच्या आत सदर जीप उलटून मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर चालक फरार झाला .स्फोटाची माहिती जिल्ह्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, भोकरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळाची पाहणी केली.यानंतर पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − 4 =

Close