पाण्यात बुडूवन ५ महिलांचा मृत्यू

Read Time:2 Minute, 44 Second

अहमदपूर : तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर कारखान्यावर ऊस तोड कामगार म्हणून पालम तालुक्यातील ११ ऊस तोड कामगार उजना परिसरामध्ये ऊसतोड करण्यासाठी आले असता उजना शिवारातील पांडुरंग परतवाघ यांच्या शेतात गेल्या आठ दिवसांपासून ऊस तोडणीचे काम चालू होतेÞ कारखाना बंद होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी ऊसतोड कामगार महिला गेले असता एक महिला पाय घसरून तलावात पडली असताना तिला वाचवण्यासाठी आई धावली, आई बुडत असल्याचे पाहून दुसरी मुलगी तलावात उतरली व तिही बुडू लागली ते पाहून दोन नातेवाईक महिलाही त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले असता एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पाच जणी बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८Þ३० वाजता घडलीÞ याबाबत किनगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उजना येथील सिद्धी शुगर कारखाना सुरु झाल्यापासून पालम तालुक्यातील ऊस तोड कामगार ऊस तोडणी साठी आले होते. कारखाना बंद होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने त्यांना गावाकड जाण्याचे वेध लागले होते. शनिवारी सकाळी राधाबाई धोंडीबा आडे वय ४५, दीक्षा धोंडिबा आडे वय २१, काजल धोंडिबा आडे वय १९ वर्षे सर्व रा. रामापूर तांडा, तालुका पालम जिल्हा परभणी व सुषमा संजय राठोड वय २२, अरुणा गंगाधर राठोड वय २६, रा मोजमाबाद तांडा तापालम . जि परभणी येथील हे ऊसतोड कामगार असून कारखान्या शेजारीच तुळशीराम तांडा तलाव आहे या तलावावरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाचही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − thirteen =