पाकविरोधात अफगाण नागरिक रस्त्यावर

Read Time:2 Minute, 6 Second

काबूल : अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान करत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात अफगाण नागरिकांनी सोमवार रात्रीपासून निदर्शने, घोषणाबाजी सुरू केली. मंगळवारीदेखील काबूलमध्ये पाकिस्तानविरोधात आणि आयएसआय प्रमुखांविरोधात शेकडोजण रस्त्यांवर उतरले. तालिबानने आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार केला.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढणा-या जमावाविरोधात राष्ट्रपती भवनजवळ तालिबानने गोळीबार केला. या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. राष्ट्रपती भवनजवळ काबूल सेरेना हॉटेल आहे. याच ठिकाणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. तालिबानींनी काही पत्रकारांवरही दडपशाही केल्याचे वृत्त आहे. या आंदोलनाचे वार्तांकन करणा-या पत्रकार, कॅमेरामन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाणिस्तामध्ये मागील एक दोन दिवसांपासून पाकिस्तानविरोधात आंदोलन होत आहे.

पाकने केले ड्रोन हल्ले
पाकिस्तानने पंजशीरमध्ये तालिबानविरोधी गटांवर ड्रोन हल्ले केले होते. त्याशिवाय पाकिस्तानचा अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप सुरू आहे. त्यानंतर स्थानिक अफगाण नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − 13 =