पहिल्यांदा ताजमहल पहायला आली होती राणी एलिजाबेथ, पाहा 60 वर्षे जुने फोटो

Read Time:4 Minute, 19 Second


नवी दिल्ली | ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगातील शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत क्विन एलिझाबेथ यांचा समावेश व्हायचा. 1952 पासून ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिजाबेथ यांच्या भारतीतील देखील अनेक आठवणी आहेत.

1961 मध्ये क्विन एलिजाबेथ यांनी त्यांच्या पहिल्या भारत भेटीत ताजमहालला देखील भेट दिली होती. दिवसा आणि अगदी रात्रीही त्यांनी ताजमहालचे सौंदर्य पाहिले होते. एलिजाबेथ यांनी प्रिन्स फिलिपसोबत आग्रा किल्लाही पाहिला.

ताजमहालला भेट दिल्यानंतर त्यांनी त्याचं वर्णन एक भव्य ठिकाण म्हणून केलं. एलिजाबेथ राणींच्या साधारण 60 वर्षांपूर्वी झालेल्या या आग्रा दौऱ्याचे फोटो आजही चर्चेचा विषय ठरतात

क्विन एलिजाबेथ रात्री नऊ वाजून गेले तरी त्यानंतर साधारण तासभर चंद्राच्या अंधुकशा प्रकाशात ताजमहाल पाहात राहिल्या. ताजमहालच्या भेटीदरम्यान एलिजाबेथ राणींनी पिरोजा पोशाख आणि पांढरी टोपी घातली होती. यावेळी त्यांच्यासोबक तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण विजयालक्ष्मी पंडित देखील होत्या.

ताजमहालमधून बाहेर पडताना रॉयल गेटजवळ उभ्या राहून एलिजाबेथ ताजमहालचे कौतुक करत राहिल्या. एलिझाबेथ राणी ताजमहाल येथे सुमारे एक तास तर आग्रा किल्ल्यावर 50 मिनिटे थांबल्या होत्या. त्यानंतर वर्षांनंतर आग्रा किल्ल्याला त्याच्या भेटीची आठवण म्हणून तिथे कारंजे चालवले गेले.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राणी एलिजाबेथ आणि प्रिन्स फिलिप ताजमहाल आणि आग्रा किल्ला पाहण्यासाठी 30 जानेवारी 1961 रोजी आग्रा येथे आले होते. यावेळी एलिजाबेथ राणीने शीश महल आणि दिवाण-ए-खास देखील पाहिले होते.

स्वातंत्र्यानंतर भारताला भेट देणाऱ्या क्विन एलिजाबेथ या पहिल्या ब्रिटिश सम्राज्ञी होत्या. त्यांच्या आधी त्यांचे आजोबा सम्राट जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी 1911 मध्ये दिल्ली दरबारला भेट दिली होती. भारतात ब्रिटिशांची वसाहत असताना त्यांनी दिल्लीला भेट दिली होती.

एलिजाबेथ राणीच्या पहिल्या भारत दौऱ्यावेळी त्यांना पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी होती. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ तिरंगा आणि युनियन जॅकने सजवण्यात आले होते. इतकंच नाही तर खास राणीसाठी लखनौहून दोन ओपन कार आणल्या होत्या.

क्विन एलिजाबेथ 1952 पासून ब्रिटनच्या महाराणी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे नवीन सम्राट असणार आहेत.

Tags:

queen movie, queen age, queen elizabeth health, queen elizabeth death time, queen meaning, Queen Elizabeth young, चार्ल्स कुले, Age of Queen Elizabeth 2, Queen Elizabeth age, राष्ट्रकुल संघटना, Queen Elizabeth 1 age, Elizabeth I age

 

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − 8 =