January 21, 2022

पर्यावरण रक्षणासाठी पक्षीमित्रांची साडेपाचशे किलो मीटर सायकल यात्रा

Read Time:3 Minute, 34 Second

लातूर : प्रतिनिधी

पर्यावरणरक्षणासह वन्यजीव रक्षणाचा संदेश घेवून वर्धा येथून सोलापुरातील राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनास सायकलवरुन निघालेल्या पक्षीमित्रांचा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. लातुरकरांनीही या पक्षीमित्रांचे मनपूर्वक स्वागत करु त्यांना निरोप दिला.

वनपरिक्षेत्र कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील उपायुक्त रविंद्र जगताप होते. विभागीय वनाधिकारी वृषाली तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, मानद वन्यजीव रक्षक राहूल जवळगे, जैवविविधता समितीचे सदस्य शहाजी पवार, पक्षीमित्र श्रीकृष्ण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वृषाली तांबे यांनी जल, जमिन अन् जंगल हाच वसुंधरेचा कना असून तो अबाधीत रहावा यासाठी सर्वांचा कृतीशिल पुढाकार गरजेचा असल्याचे सांगत पर्यावरण अन् वन्यजीवाचे रक्षण करण्यासाठी सायकलवरुन पक्षीसंमेलनाला जाणा-या युवकांचा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे, असे गौरोदगार काढले. यावेळी बहार नेचर फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर वानखेडे यांनी पर्यावरण अन आरोग्यरक्षणासाठी हा सायकलप्रवास असून यात वन्यजींवाच्या रक्षणाची संदेशही आपण पोहचवत असल्याचे सांगितले.

सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शहाजी पवार यांनी लातूरच्या उज्जवल जैवविविधतेचा इतिहास सांगितला. प्रास्ताविकात वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी लातुरच्या वनक्षेत्र आणि उपक्रमाबद्दल माहिती दिली. सुत्रसंचलन वनपाल निलेश बिराजदार यांनी केले. वनरक्षक महेश पवार यांनी उपस्थितींचा परिचय दिला. वनरक्षक रवी नाराणकर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. किशोर वानखेडे, दिलीप विरखेडे, हेमंत धानोरकर, धनंजय गुट्टे, देवर्षी बोबडे, दीपक गुडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी
संदेशाद्वारे या पक्षीमित्रांच्या पर्यावरण व वन्यजीव हितैषी कार्याचे कौतूक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. सायकल बड्डीज ग्रुप व रन फॉर लाईफ ग्रुपने सत्कार केला. पक्षीमित्र हेमंत रामढवे, डॉ. नेताजी शिंगटे, विकास कातपूरे, डॉ. विमल डोळे, शिवशंकर फिसके जमनादास काथवटे, आनंद मुलगे आंदिसह सुमारे १०० सायकलिस्ट व रनर यांच्यासह पक्षीमित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 14 =

Close