पर्यटकांना भुरळ घालणा-या सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारण

Read Time:1 Minute, 36 Second

ईस्लापुर : गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे.यामुळे पर्यटकांना भुरळ घालणारा सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. गेल्या दोन दिवसापासून किनवट,हदगाव, हिमायतनगरसह पैनगंगा नदीच्या पट्टयात जोरदार पाऊस होत आहे.यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ईस्लापुर येथील धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. कड्याकपा-यावर पडणा-या पावसाच्या थेंब आणि धबधब्यातून उडणारे फवारे आणि परिसरात वृक्षवल्लीने पांघरलेले हिरवा शालू परिधान केल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना खुणावत आहे. १०० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा प्रचंड क्षमतेने वाहू लागला आहे. नांदेड – किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या आणि रेल्वे स्थानकापासून ३ किमीवर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सहस्रकुंड बाणगंगा धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले आपसूकच सहस्त्रकुंडकडे वळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − 2 =