January 21, 2022

परमबीर सिंह विदेशात फरार?

Read Time:2 Minute, 18 Second

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. भ्रष्टाचारासह खंडणी प्रकरणात मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्येही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या अटकेच्या भीतीपोटीच परमबीर सिंह हे देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना असल्याचे मीडिया रिपोटर््समध्ये सांगितले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक वेळा परमबीर सिंह यांना समन्स बजावला आहे. मात्र, असे असूनही त्यांना कुठेही पत्ता लागला नाही. यामुळेच एनआयएला संशय आहे की, अटकेच्या भीतीपोटी परमबीर सिंह हे देश सोडून फरार झाले आहेत. एनआयएने अँटिलिया स्फोटके यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंह यांना समन्स बजावले होते.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालकांकडून राज्याच्या गृहविभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. आता यावर गृहविभागाने संबंधित अधिका-यांच्या सहभागाच्या पुराव्याविषयी माहिती मागवली आहे. त्यानंतर या सर्व पोलिस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अटकेची शक्यता तसेच निलंबनाच्या कारवाईमुळे परमबीर सिंहांनी देश सोडला असल्याची शंका तपास यंत्रणांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 11 =

Close