परप्रांतीय मजुर पुन्हा परतीच्या वाटेवर …….

Read Time:3 Minute, 39 Second

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परिणामी निर्बंध कडक होत असतांना मोठ्यांसंख्येने परप्रांतीय मजुर आपल्या मुळ गावी गेले होते. मात्र आता रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. तसेच उद्योगांना सुरळीत सुरु ठेवण्याची परवानगी व मोठ्या शहरांकडे लोकांची गर्दी वाढते आहे. त्यामुळे मजुरांनीसुद्धा महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद, नाशिक सारख्या शहरांमध्ये मोठ्यासंख्येने परप्रांतीय मजुर दाखल होत आहे.

फेबृवारीपासून दुसर्‍या लाटेंस महाराष्ट्रात सुरुवात झाली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध कडक केले. पॉझीटीव्हीटी रेट जास्त असणार्‍या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे परप्रांतीय मजुरांचे रोजगार धोक्यात आले होते. परिणामी मजुरांनी घरची वाट धरली होती. मात्र आता पुन्हा सर्व सुरळीत होत असतांना मजुरांनी पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत सर्वाधीक मजुर दाखल होत आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते. मुंबईत रोजगाराच्या सर्वाधीक संधी असल्यामुळे मजुरांची पहिली पसंती मुंबईला असते. मे आणि जुन महिन्यांत २८ लाख मजुर मुंबईत रेल्वेच्या माध्यमाने दाखल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगीतले आहे.

मुंबईच्या रल्वे स्थानक‍ांवर देशाच्या ऊत्तर, दक्षिण भागांतील अनेक एक्सप्रेस गाड्या येतात. या गाड्यांमधून मोठ्यासंख्येने मजुरवर्ग प्रवास करत असतो. पश्चिम रेल्वेतून ७ लाख तर मध्य रल्वेतून २८ लाख मजुर मुंबईत आले असल्याचे रल्वे प्रशासन अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

ऊ.प्रदेश, म.प्रदेश, राजस्थान, केरळ, पं.बंगाल या भागातून सर्वाधीक मजुर महाराष्ट्रात येत असतात. त्यामुळे स्थानकांवर चाचण्यांना वेग देण्यात आला असून नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.

गेल्या वर्षीसुद्धा लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी रल्वेने श्रमीक रेल्वे सुरु केली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर दुसर्‍या लाटेने धडक दिली. पहिली लाट शिथील झाल्यापासून प्रवाशांची रीघ सुरु झाली होती. मात्र गेल्या वर्षीपासून मे आणि जुन महिन्यांत सर्वाधीक प्रवासी मुंबईत दाखल झाले असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + ten =