January 22, 2022

पदोन्नतीत आरक्षण | २० मे रोजी राज्यव्यापी आंदोलन

Read Time:1 Minute, 41 Second

पदोन्नतीत आरक्षण रद्द केल्या प्रकरणी २० मे रोजी राज्यव्यपी आंदोलन करण्यात येत असून सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

आज महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली.यावेळी पांडुरंग कवने (औरंगाबाद), प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे (नांदेड),
प्रा.विलास भालेराव (लातूर), राजा रणवीर (अलिबाग),संजय शीतळे (अहमदनगर)ऍड.प्रशांत कोकणे (नायगाव), अशोक गोडबोले (लातूर),सिद्धार्थ हत्तीआंबीरे,प्रा.चौडेकर,अरुण दगडू नांदेड,रेखा ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढील आंदोलन करण्यासाठी आरक्षण हक्क संवर्धन समिती महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली.अध्यक्ष पांडुरंग कवने, उपाध्यक्ष राजा रणवीर,सचिव संजय शीतले,सहसचिव प्रा.विलास भालेराव,कोषअध्यक्ष प्रा.विजय खूपसे व संघटक श्याम निलंगेकर यांची निवड करण्यात आली.

पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे या व इतर मागण्यासाठी २१ ते ३१ मे दरम्यान स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

Close