पत्राचाळ घोटाळा प्रकरणी महत्वाची बातमी समोर, राऊतांच्या अडचणी वाढणार?

Read Time:1 Minute, 33 Secondमुंबई | शिवसेनेचे (shivsena) प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या ते आर्थर रोड कारागृहात आहेत. झालेल्या सुनावणी संजय राऊतांच्या कोठडीत 19 संप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

याचदरम्यान राऊतांनी जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. राऊतांनी अर्ज केल्यानंतर 16 सप्टेंबरपर्यंत ईडीने (ED) उत्तर द्यावे, असे निर्देशच विशेष पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ विकसित करण्याचं काम आशिष कन्स्ट्रक्शन (Ashish Construction) कंपनीला देण्यात आलं होतं. त्यातील काही भाग खासगी कंपनीला विकण्यात आला होता. यामध्ये राऊतांचा हात असल्यानं त्यांना अटक करण्यात आली आहे.

राऊतांना अटक झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. ईडीने निकाल दिल्यानंतर राऊतांच्या कोठडी 19 सप्टेंबरपर्यंत वाढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – Leave a Reply

Your email address will not be published.

18 − fifteen =