पत्रकार सुधीर चौधरी दहशतवादी?

Read Time:1 Minute, 49 Second

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आले आहे. देशाच्या राजकुमारी असणा-या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला. सुधीर चौधरी हे वादग्रस्त व्यक्तीमत्व असून ते असहिष्णु दहशतवादी आहेत, अशा शब्दांमध्ये राजकुमारीने टीका केली.

राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आले आहे. राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिले असून, ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिले आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आला. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × 3 =