पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

Read Time:1 Minute, 33 Second

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती.

मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी दिली जाईल, अशी घोषणा तामिळनाडू भाजपने केली आहे. इतकंच नाही तर मोदी 72 वर्षांचे होत आहेत म्हणून यादिवशी 720 किलो मासे देखील वाटले जाणार आहेत.

चेन्नईतील आरएसआरएम या रूग्णालयात मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना प्रत्येकी 2 ग्रामची  सोन्याची अंगठी दिली जाणारे ज्याची किंमत 5 हजारांच्या घरात असू शकते.

दरम्यान, तामिळनाडूचे मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. तर 17 सप्टेंबर रोजी या आरएसआरएम रूग्णालयात 10 ते 15 मुलांचा जन्म होण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen + four =