July 1, 2022

पंतप्रधान मोदींचे विमान टाळणार अफगाण हवाई क्षेत्र

Read Time:2 Minute, 19 Second

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार दि. चार दिवसीय अमेरिकेच्या दौ-यासाठी निघाले आहेत. मात्र, या दौ-यामधील खास गोष्ट अशी आहे की, त्यांचे अमेरिकेकडे जाणारे विमान अफगाणिस्तानमधून जाणा-या हवाई क्षेत्राचा वापर करणार नाही.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून अमेरिकेत जाणार आहेत. यासाठी पाकिस्तान सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु असणा-या तालिबान संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भारत सरकारने पाकिस्तानकडून त्यांचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी मागितली होती. पाकिस्तानने ही परवानगी दिली आहे.

२०१९ मध्ये पाकने दिला होता नकार
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परदेश दौ-यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला होता. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्राचा वापर करण्यावर प्रतिबंध लादला होता. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय नागरी उड्डान संघटनेमध्ये याचा कडक निषेध व्यक्त केला होता. हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप देखील भारताने लावला होता. तरीही भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या श्रीलंका यात्रेसाठी आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − 17 =

Close