August 19, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय! आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव असणार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

Read Time:2 Minute, 29 Second

टोक्यो ऑलम्पीकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवत भारताला ४१ वर्षांनी हॉकीत पदक मिळवून दिले. त्याबद्दल हॉकी खेळाडूंचे संपूर्ण भारतभरात प्रचंड कौतुक होते आहे.

भारतात हॉकी म्हटले की सर्वप्रथम मेजर ध्यानचंद याचे नाव भारतीयांच्या ओठावर येते. या पार्श्वभूमिवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे मेजर ध्यानचंद यांच्या कतृत्वाचा हा गौरव असल्याचे मत काही खेळाडूंमधून व्यक्त करण्यात येत आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणारा खेलरत्न पुरस्कार भारतात खेळ प्रकारांतील सर्वाधीक मोठा पुरस्कार मानला जातो. असंख्य भारतीयांची ही ईच्छा होती की, या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कार असावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.

हॉकीमध्ये भारताथच नव्हे तर संपूर्ण जगात मेजर ध्यानचंद यांची वेगळी ओळख आहे. ऑलम्पीकमध्ये तीनवेळा सुवर्णपदक जिंकणार्‍या संघात ते खेळले आहेत. १९५६साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारच्यावतीने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × five =

Close