पंजाबमध्ये २५ हजार पदांची होणार भरती

Read Time:1 Minute, 1 Second

चंदीगढ : पंजाब विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आपने सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. यातच पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पंजाब मंत्रिमंडळाने शनिवारी एकूण २५ हजार सरकारी नोक-या उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर केला.

ज्यामध्ये पंजाब पोलिस विभागात १० हजार आणि इतर सरकारी विभागांमधील १५ हजार रिक्त पदांचा समावेश आहे. पंजाबमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी भगवंत मान मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =