पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी सिद्धू कायम राहणार

Read Time:2 Minute, 4 Second

नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत वादानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे नवज्योतसिंग सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहतील आणि पक्षसंघटना मजबूत करतील, हे आता स्पष्ट झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली जाणार आहे, अशी माहिती पंजाबचे कॉंग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी दिली.

आम्ही सर्व मुद्दे चर्चेतून सोडवू. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी सर्व मुद्यावर चर्चा केली आहे. लवकरच ज्या काही समस्या आहेत, त्या चर्चेतून सोडविल्या जातील, असे रावत म्हणाले. सिद्धू यांनी गुरुवारी कॉंग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांची भेट घेतली आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांनी पूर्वी ज्या मुद्यावर राजीनामा दिला, त्याबद्दल माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ अकबर रोड (कॉंग्रेस मुख्यालय) येथे जवळपास सव्वा तास चाललेल्या बैठकीत पंजाब सरकार आणि पक्षाशी संबंधित मुद्यांवर चर्चा झाली आणि एकमत करण्याचा प्रयत्न झाला. जेणेकरून संपूर्ण निवडणुकीपूर्वी पक्ष एकत्र येऊ शकतो. दरम्यान, सिद्धू यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून, ते जे निर्णय घेतील, तो कॉंग्रेस आणि पंजाबच्या हिताचा असेल, असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + eighteen =