पंकजा मुंडेंनी राजकारण सोडलं?

Read Time:2 Minute, 13 Second

मुंबई : झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमी प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर होत असतात. या वर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका’ या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे निवेदन करणार म्हटल्यावर वेगळीच चर्चा रंगली आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची ही नाराजी अनेकदा दिसून आली. त्यांच्या समर्थकांकडूनही अनेकदा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात होती, ते नाही तर राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद तरी दिले जावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यापैकी काहीच न घडल्याने पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज आहेत हे चित्र आता काहीसे स्पष्ट होत चालले आहे.

त्यामुळे झी च्या एका चॅट शो मध्ये सहभाग घेतल्यानंतर थेट त्या वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याचे चक्क निवेदन करताना पंकजा मुंडे दिसणार असल्याने आता वेगळ्याच चर्चेला रंग चढला आहे. पंकजा मुंडे राजकारणातून बाहेर पडणार का? मनोरंजन क्षेत्रात रुळणार का? मनोरंजन क्षेत्रात नवी इनिंग सुरु करत आहेत का? अशा एक ना वारेमाप प्रश्नांची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे पंकजा मुंडेच आपल्याला सांगू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten + 10 =